“साईच्छा सुर संगम कार्यक्रम” बेलपाडा यांच्या वारकरी भजन मंडळाची १० वर्षांची यशस्वी वाटचाल..!
साईच्छा सुर संगम कार्यक्रम बेलपाडा यांच्या वारकरी भजन.

दैनिक झुंजार टाईम्स
कैलासराजे घरत:- पेन प्रतिनिधी
दिनांक:- ०९-०९-२०२५
बेलपाडा:- जिथे झाली बाबांची ईच्छा तिथून सुरुवात झाली सुर संगम कार्यक्रम बेलपाडा साईच्छा.गेले दहा वर्ष नरेश कोळी साई राम यांच्या संकल्पनेत शून्यातून निर्मिती झाली ते साईच्छा वारकरी भजन ज्यात फक्त वाजवण्यासाठी दुसऱ्यांनी दिलेले मृदुंग तिथून सुरुवात झाली बाबांच्या इच्छेने आज सर्व साहित्य रिदम म्युझिकल साऊंड सिस्टम घेऊन गणपती, नवरात्र, दसरा, गणपती, दत्त जयंती, महाशिवरात्री, गोकुळाष्टमी, श्रीराम नवमी, श्री.माघी गणेश जयंती, गोवलदेव मोठ्या बायांच्या जय जयकार, बायांच्या सरवराची गाणी असा जल्लोष कार्यक्रम गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने सुरू आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमात सर्व तरुण मुले जे क्लासिकल आहेत आणि यांच्या संगीत क्लासची फी साईच्छा सुर संगम मधून देत असतो. नवीन संकल्पनेत नवीन ढंगात मनोरंजनातून भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर करतांना नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकली जातात असा सूर संगम कार्यक्रम बेलपाडा आपल्या सेवेसाठी अवश्य मागवा… संकल्पना नरेश कोळी-साई राम, अनमोल दिगंबर कोळी, प्रकाश तांडेल, कडू बाबा, अंश कडू, रुद्र नरेश कोळी, दीप्तेज कोळी, चिन्मय कोळी पांडुरंग म्हात्रे, शक्ती पाटील, सिद्धू घरत, सुहानी घरत, रंजना कोळी यांच्या सुमधुर आवाजात सुर संगम कार्यक्रम दरवर्षी नव्या ढंगात होत असतो सुरवातीपासून आतापर्यंत प्रत्येक गावोगावी हे कार्यक्रम झाले गेल्या दोन वर्षापासून हाच कार्यक्रम ठाणे, रायगड, नवी मुंबई जिल्ह्यात फेमस झाला असून या कार्यक्रमासाठी तीन तीन महिने आधीच बुक केले जाते असा हा कार्यक्रम तरुण नव्या पिढीला आनंद घेऊन संस्कृती, परंपरा जोपासणारी ही साईच्छा कमी वयात ज्यांना साई नामाची गोडी लागली ते कलाकार घेऊन येत आहेत दरवर्षी नव्या संकल्पनेत मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम साईच्छा सुर संगम कार्यक्रम बेलपाडा.
अतिशय सुरेख पारंपरिक भजन आणि आगरी कोळी भावगीते आणि त्याला आधुनिक म्युझिक साथ घेत साईच्छा सुर संगम भजन बेलपाडा यांच्या सोबत मी पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत पुरोगामी पत्रकार संघ पेण तालुका अध्यक्ष सदैव सोबत असून माझे मित्र आगरी कोळी नाट्य कला दिग्दर्शक नटसम्राट दिगंबर कोळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ नक्कीच पुढे यशस्वी वाटचाल करत राहील. त्यांच्या वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि आपण भविष्यात यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करत रहा ह्याच सदिच्छा.




