विश्वकर्मा विकास ट्रस्ट तर्फे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी.

दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- मुंबई प्रतिनिधी
बुधवार दि. १७ सप्टेंबर
मुंबई:- मानखुर्द (पश्चिम) रेल्वे स्टेशन शेजारील परिसरात विश्वकर्मा विकास ट्रस्ट (रजि.) तर्फे भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षीच्या जयंती सोहळ्याचे हे १२वे वर्ष असून, मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला.
यावेळी सार्वजनिक प्रसाद वाटप व भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वकर्मा विकास ट्रस्टसाठी स्थायी जागा मिळविण्यासाठी समाजसेवक मा. गणेश कदम यांच्या अथक प्रयत्नांसह मा. आमदार राहुल शेवाळे यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
जयंती सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यामध्ये –
पवन विश्वकर्मा – अध्यक्ष
शिवसागर चौधरी – सचिव
बृजेश विश्वकर्मा – खजिनदार
संजय विश्वकर्मा – उपखजिनदार
मनोज विश्वकर्मा – उपाध्यक्ष
यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचे योगदान लक्षणीय राहिले.
भक्तिभाव, सामाजिक बांधिलकी आणि उत्साहाच्या वातावरणात विश्वकर्मा जयंती सोहळा यंदाही यशस्वीरीत्या पार पडला.




