डोळे पाणावले, पोलीस भगिनीचे आझाद मैदान मोकळे झाल्यावर.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधि
दिनांक:- ०५-०९-२०२५
मुंबई:- खरंतर २७ ऑगस्ट पासून मराठा आंदोलन मोर्चा मुंबईत दाखल झाला. खचाखच आझाद मैदान भरलेले पण बंदोबस्तात मुंबई पोलिसांचा प्रचंड ताफा त्यामध्ये मराठी महिला पोलिसांचाही समावेश होता. दुसऱ्या दिवसापासून मुंबईमधील हॉटेल व दुकाने बंद झाल्याने गावाकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली व काही बांधवांनी नियोजन करून गॅस तांदूळ पीठ आणल्यामुळे जेवण बनवले व ठाम निश्चय केला आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचे नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्ध लढण्यासाठी जाताना सर्व साहित्य सोबत घेऊन जायचे जेणेकरून माघारी यायचे निश्चित नसायचे. महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी रेल्वेने मुंबईतील मराठी मावळ्यांनी खाणपणाची व्यवस्था रेल्वेने केली. गर्भवती महिला वयस्कर महिला पुरुष या गर्दीतून जाण्यासाठी गावाकडच्या मराठी बांधवांनी जाणण्यासाठी रस्ता दिला हे आपण सोशल मीडियावर बघितले. मराठा मुंबईकरांना गावाकडून आणलेली ठेचा, भाकरी चटणी ,लोणचे यांचा आस्वाद पोलीस पत्रकार यांना घ्यायला मिळाला व मायेचे शब्द कानावर पडले.
मराठा मावळ्यांनी गावाकडे जनावरे ,आपली शेती हे सर्व सोडून मुंबईला आले तर कोणाचे वयोवृद्ध, आई-वडील ,पत्नी , लहान मुले मुंबईला आले. गावाकडची संस्कृती मराठ्यांनी हात जोडून अवघ्या महाराष्ट्राला दाखवली. यामध्ये गावाकडच्या सरपट्या, कबड्डी, खो खो यासारखे खेळ सुद्धा मुंबईत दाखवले.
मराठ्यांच्या लहान मुलांनी मुंबईला येताना वडीलधाऱ्या माणसांना विचारले आपल्याला आरक्षण भेटेल का? ही गोष्ट नांदेडच्या काकांनी त्या पोलीस भगिनीला सांगितल्यावर सर्वांचे डोळे पानावले. टीव्हीवर चालणारी न्यूज मुंबईत आलेले सर्व मराठी बांधव बघत होते पत्रकार सुद्धा आपणास डोळे पानावताना दिसले. पोलीस मराठ्यांना सांगत असेल तीन वाजेपर्यंत मुंबई खाली करा तेव्हा मराठा बोलायचे “आम्हाला आरक्षण द्या आम्ही पाच मिनिटात मुंबई सोडतो”
आरक्षणाची घोषणा २ सप्टेंबर रोजी झाले तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांना हात जोडून नमस्कार करून सांगत होता “साहेब तुम्ही आम्हाला सत्कार केले”तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगत होता.
पोलीस भगिनी दुसऱ्या दिवशी आझाद मैदानावर गेल्यावर तेथे एकही मराठा मावळा नव्हता त्यावेळी भगिनीचे डोळे भरून आले. तिला गावाकडची माणसं दिसले की खूप बरं वाटायचं ओळख नसली असली तरी त्यांचं साधे राहणीमान , साधे बोलणं मनाला चटका लावणारे होते. त्या भगिनीचे सहा वर्षातून मराठा आंदोलनाच्या बंदोबस्तावेळी डोळे भरून आले. मैदानात प्रत्येक क्षण डोळ्यासमोर येत होता. मुंबईमध्ये नोकरीसाठी आलेली पोलीस दलातील भगिनी अंतर्मनाने मराठा बांधवांच्या आरक्षणात सहभागी होती हे नक्कीच……….




