भगवान विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- १७-०९-२०२५
लातूर:- आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी बुधवारी भगवान विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. देवांचे शिल्पकार, जगाचे पहिले अभियंता आणि सृष्टीचा निर्माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी लोक आपली कार्यस्थळे, यंत्रसामग्री आणि अवजारांची पूजा करतात, ज्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते आणि कामामध्ये प्रगती होते असे मानले जाते असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायत अहमदपूरचे शहराध्यक्ष रमाकांत आरनुरे यांनी केले. यावेळी विश्वकर्मा चालीसा पठण करण्यात आले. जयंती साजरी करतेवेळी गोविंद महाराज,राम रत्नपारखे,हरी पारडे ,गोटू लाटकर,शरद मैड, धनाजी केचे, परमेश्वर कउटकर, प्रविण महामुनी, कृष्णा काळे, संतोष पांचाळ आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत अहमदपूरचे शहराध्यक्ष रमाकांत आरनुरे उपस्थित होते.



