मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या.

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातुर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- १४-०९-२०२५
अहमदपूर:- लातूर जिल्ह्यातील तालुका अहमदपूर मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या अहमदपूर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि गावात एकही कुणबी नोंद न निमिळाल्याने निराश झालेल्या २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी घडली असून अभिजीत गोविंद सोळंके वय २७ राहणार खंडाळी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर असे मृत्यू तरुणाचे नाव आहे या संदर्भात मयात अभिजीत चा संख्खा लहान भाऊ शिवदास गोविंद सोळुंके यांनी सांगितले की माझा भाऊ शिवदास हा आरक्षणासाठीच्या विविध आंदोलनामध्ये सक्रिय होता गावामध्ये कुणबी समाजाची कोणतेही नोंद सापडली नाही मला दोन मुली आहेत आणि गावात एकही कुणबी नोंद सापडत नाही आता कसे होणार मराठा म्हणून तो तणावात दिसत होता शासनाकडून त्याने होणारे सतत्याने होणारी फसवणूक यामुळे तो निराश झाला होता शहरात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या अभिजीत ने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याचे मयात अभिजीत चा भाऊ शिवदास सोळुंके याने सांगितले या घटनेची नोंद अहमदपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे




