राजकारण
मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ऐतिहासिक पाऊल.
"शिवा" अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल.

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातुर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- ०९-०९-२०२५
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेणाऱ्या शासनाच्या २ सप्टेंबर २०२५ रोजीच्या चुकिच्या निर्णयाला आव्हान देत, शासन निर्णय रद्द करून तत्काळ स्थगिती द्यावी, तसेच हैदराबाद गॅझेटनुसार जात नोंदींचा फेरफार थांबवावा, या ठाम मागणीसाठी जनहित याचिका (स्टॅम्प क्रमांक ३०२९६ / २०२५) आज दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
ही याचिका शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष धर्मवीर प्रा. मनोहर धोंडे यांनी प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ऍड. सतीश तळेकर यांच्या मार्फत दाखल केली असून, उद्या दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी मा. उच्च न्यायालयात प्रथम सुनावणी होणार आहे.
ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ नये, मूळ ओबीसी समाजाला न्याय मिळावा आणि अन्यायकारक निर्णयांना अटकाव व्हावा या ध्येयाने शिवा संघटना संघर्षपथावर उभी आहे.




