संघातील बहुआयामी शिक्षक रवीजी बोकील यांचे निधन.

दैनिक झुंजार टाईम्स
राम रत्नपारखे:- लातुर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक:- ०६-०८-२०२५
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवीजी बोकील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रवीजी बोकील मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे. मेकॅनिकल इंजिनिअर असलेले रवीजी बालवयातच संघसंपर्कात आले. संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी बिहारमध्ये १२ वर्ष पूर्ण वेळ काम केले. आसाम, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा या भागात त्यांनी असंख्य घोष वादक व शिक्षक घडवले. लहानपणापासूनच विविध प्रकारची वाद्य वाजवण्यात ते निष्णात होते. नाटक, चित्रकलेची त्यांना विशेष आवड होती. संघाच्या सर्व शारीरिक विषयात ते निष्णात होते. संगीताची जाण असल्याने विविध भाषेतील पद्ये लीलया म्हणत असत. घोष साहित्याच्या दुरुस्तीमध्ये त्यांचा हातखंडा होता. अनेक वर्ष संघ शिक्षा वर्गात त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. केनिया आणि मॉरिशस या देशातही त्यांनी दोन वर्ष प्रचारक म्हणून काम केले. संघातील निष्ठावान शिक्षकास भावपूर्ण श्रद्धांजली.
#vivek #RSS100Years




