विक्रम साबळे फाउंडेशन आयोजित ‘मन की बात’कार्यक्रम संपन्न ; विक्रम साबळे फाउंडेशन गणेश उत्सव सजावट स्पर्धा निकाल जाहीर …

दैनिक झुंजार टाईम्स
साबीर शेख:- खोपोली प्रतिनिधी
दिनांक:- ०२-०९-२०२५
खोपोली:- विक्रम साबळे फाउंडेशन आयोजित मन की बात कार्यक्रम भाजप कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत महाराजा मंगल कार्यालय सभागृहाच्या ठिकाणी रविवारी दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता सुंदर नियोजन पध्दतीने संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवाद बैठकीतील अनेक मुद्द्यावर सविस्तरपणे विश्लेषण साधत कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा व प्रोत्साहन आल्याचे पाहायला मिळाले.
तर दुसरी कडे सायंकाळी विक्रम साबळे फाउंडेशन गणेश उत्सव सजावट स्पर्धा २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आला. उत्सव परंपरा, अभिमान संस्कृती अश्या संकल्पनेतून सजावट कलेच्या गुणवत्तेत निकाला अंती अथर्व घारे यांना प्रथम पारितोषिक ११ हजार १११ तर श्रीयंश पुरी यांना द्वितीय पारितोषिक ७ हजार ७७७ तसेच तृतीय पारितोषिक राजाराम कुंभार यांना ५ हजार ५५५ हि रोख बक्षिसे आणि सर्व विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .यावेळी माजी नगरसेवक अविनाश तावडे व विक्रम साबळे फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम साबळे , इंदरमल खंडेलवाल, हेमंत नांदे, अश्विनी अत्रे भाजप शहर महिला मोर्चा अध्यक्ष ,सुनील नांदे आदी शिष्टमंडळ उपस्थित होते.




