नोकरी विशेष
शेतकऱ्याच्या मुलीची मेट्रो ट्रेनमध्ये चालक पदावर नियुक्ती.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड:- प्रतिनिधी
दिनांक:- १७-०९-२०२५
सांगली:- सांगलीतील दीपक वाडीतील शेतकरी कुटुंबातील संध्या भीमराव दीपक हिने मुंबईत मेट्रो ट्रेनमध्ये चालक पदावर नियुक्ती झाली आहे. भीमराव दीपक अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्या कष्टाचे चीज मोठ्या मुलीने केल्याने ग्रामीण भागात वेगळे ओळख निर्माण झाली. संध्याचे सातवी पर्यंतचे शिक्षण आटुगडेवाडी व माध्यमिक शिक्षण येळगाव येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण उंडाळे येथे, तर कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली.
मे महिन्यात मुंबई येथे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. संध्या उत्तीर्ण होऊन मोटर चालक बनली. कराड तालुक्यात शेतकऱ्याची मुलगी मेट्रो चालक बनली याचे कौतुक सर्व ठिकाणी होत आहे.
