तातोबा पवार यांना मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न २०२५ पुरस्काराने सन्मानित!

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक:- ०६-०९-२०२५
कोल्हापूर येथे झालेल्या मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्काराने तातोबा पवार यांना सन्मानित करण्यात आले. गेली आठ ते नऊ वर्षे आरोग्य सेवक म्हणून काम करत असताना त्यांनी रुग्णांना सेवा देऊन एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णांना मदत करणे व त्यांना वैद्यकीय उपचारासाठी जागा मिळवून देणे, औषधांची सुविधा करणे अशा अनेक सामाजिक कार्य केल्यामुळे त्यांना त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. ते सध्या वैद्यकीय क्षेत्रात सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे आरोग्य सेवक म्हणून काम करत आहेत.
त्यांच्या सामाजिक कार्यात अनेकांना मदतीचे हात मिळाल्याने असंख्य रुग्णांना मदत झाली आहे. याच कामाची पोचपावती म्हणून मेजर ध्यानचंद महाराष्ट्रात क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कराड तालुक्यातील त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.




