आत्महत्या -खुन
ओबीसी आरक्षणावरून बीडमध्ये व्यक्तीची आत्महत्या.

दैनिक झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- बीड प्रतिनिधी
दिनांक:- १५-०९-२०२५
बीड:- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीड जिल्ह्यातील नाथापूर येथे गोरख नारायण देवडकर (५०) यांनी आत्महत्या केली. त्यांच्या दोन मुली पोलीस भरतीची तयारी करत असून, ओबीसी आरक्षण संपल्याने त्यांच्या भविष्यासाठी चिंता वाढली होती. हा जिल्ह्यात ओबीसी आरक्षण बचावासाठी दुसरा आत्महत्येचा प्रकार असून, यामुळे कुटुंब आणि परिसरात शोककळा पसरली आहे. शासनाने वेळेवर तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या वादातून राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे



