बाल्या डान्स मंडळाचं थाटामाटात उद्घाटन!

दैनिक झुंजार टाईम्स
अलंकार कडू:- उरण प्रतिनिधी
दिनांक:- १९-०७-२०२५
उरण तालुक्यातील रांजनपाडा गावात नुकतेच बाल्या डान्स मंडळाचे उद्घाटन समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडले. जय हनुमान नाच मंडळ हे उरण तालुक्यातील पारंपरिक व सुप्रसिद्ध नाच मंडळ आहे. हें नाच मंडळ गेले २५ वर्ष आपली कला लोकां पर्यंत पोहचवत आहे.
जय हनुमान नाच मंडळाचे सुरवातीचे गायक गव्हाण कोपर गावचे स्वर्गीय. अमृत बुवा मोकळ हें आपल्या आवाजाने आणि त्यांच्या गाण्याने प्रेक्षकांना मंत्र मुग्धा करत असत.आज ते ह्या जगात नाहीत तरीपण त्याची गाणी आणि त्यांचा आवाज लोकांच्या मनात जागा करून राहिला आहे त्यांची आठवण आणि त्यांची कमी हनुमान नाच मंडळाला कायम राहील.
तसचे ह्या नाच मांडलाला स्वर्गीय भालचंद्र घरत उरण डोंगरी चे कवी लाभले होते, त्यांची अनेक गाणी आजरामार आहेत आणि आज पर्यंत ती गाणी ह्या नाच मंडळात गायली जातात.
या नाच मंडळ उदघाटन समारंभा साठी रांजनपाडा गावातील रमेश पाटील, अनंत पाटील, हसूरम पाटील, रमाकांत म्हात्रे, पुरोगामी पत्रकार संघांचे उरण तालुका संघटक अलंकार कडू पुरोगामी पत्रकार संघाचे उरण तालुका कार्याध्यक्ष प्रविण नाईक, बुवा चंद्रकांत पाटील, ढोलकी वादक विलास पाटील, कच्ची वादक अंकुश ठाकूर आणि रानजापाडा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.
सर्व मान्यावरांनी जय हनुमान नाच मंडळाला पुडील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.