उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ.
१ डिसेंबरपासून HSRP नसलेल्या वाहनांवर कारवाई.

दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- उलवे-नवीमुंबई प्रतिनिधी
दिनांक:- १५-०८-२०२५
मुंबई. शुक्रवार दिं १५:ऑगस्ट. राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. यापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख होती. मात्र वाहनधारकांचा प्रतिसाद कमी असल्याने आता ही मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन HSRP बसविण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
तथापि, १ डिसेंबर २०२५ पासून HSRP न बसविलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या सर्व वाहनधारकांनी मुदत संपण्यापूर्वी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसवावी, असे सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी स्पष्ट केले आहे.