संघर्ष युवा प्रतिष्ठानतर्फे माझा “गणपती माझी- सृजनशीलता” विशेष उपक्रम.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पाचगणी प्रतिनिधी
दिनांक:- ३०-०८-२०२५
सातारा:- पाचगणी तालुका शिराळा येथील संघर्ष युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे गणेश उत्सवा निमित्त “माझा गणपती माझी सृजनशीलता” या विशेष उपक्रमातून स्वातंत्र्यवीरांची शौर्यगाथा चित्रप्रदर्शन करण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षे संघर्ष युवा प्रतिष्ठान पाचगणी सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर भूमिका घेत असते. अनेक पुरस्काराने संघर्ष युवा प्रतिष्ठान पाचगणी यांना सन्मानित केले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी एक विशेष उपक्रम म्हणून चित्रप्रदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे या प्रदर्शनात १०० पेक्षा अधिक स्वातंत्र्यवीर व शूरवीरांच्या छायाचित्रांचे विचारांचे आणि संदेशांचे दर्शन घडवले जाणार आहे. फक्त चित्र प्रदर्शन नसून तर आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची प्रेरणादायी आठवण ठरेल. या सामाजिक उपक्रमाच्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना ,युवकांना व गावातील नागरिकांना आपल्या देशातील शूरवरांनी दिलेल्या बलिदानाची व शूरवीरांची प्रेरणादायी गाथा समजून एक नवीन पिढीला आदर्श घडवण्याचे काम संघर्ष युवा प्रतिष्ठान पाचगणी यांनी करण्याचे आयोजन केले आहे.
रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पाचगणी हनुमान मंदिर येथे केले आहे तर १ सप्टेंबर रोजी मानेवाडी २ सप्टेंबर रोजी गुडे येथे चित्र प्रदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. पाचगणी, मानेवाडी, गुढे या विभागातून विशेष कार्यक्रमाचे कौतुक केले जात आहे.




