ढगफुटी म्हणायची की अतिवृष्टी!

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- २२-०८-२०२५
गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. महाराष्ट्रातील अनेक दुष्काळी जिल्ह्यात कधी न पडलेला पाऊस यावर्षी पडला. राज्यभर गेल्या पाच दिवसात २९बळी गेले. सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील बारा लाख हेक्टर शेती बाधित झाली आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली आहे. केवळ २४ तासात साडेतीनशे मिलिमीटर पाऊस पडून पावसाने आजपर्यंतचा विक्रमच मोडला आहे. मुंबईकरांना कंबरेबरं पाण्यातून वाट काढून चाकरमान्यांना दुपारीच घरी परतावे लागले आहे.
मुंबईत रेल्वे रूळ पाण्याने भरल्यामुळे रेल्वे ठप्प झाली होती. रस सकल भागात तुडुंब पाणी भरले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर रिक्षा, टॅक्सी ,बस अशा प्रकारचे वाहने अडकली होती. प्रवाशांना घरी जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने मनोरेल मध्ये तुडुंब गर्दी झाली आणि मोनोरेल बंद पडली. यावेळी मुंबईकरांना २६ जुलै २००५ ची आठवण झाली.
महाराष्ट्र प्रशासन प्रत्येक वेळी नाले सफाई, नद्या सफाई नद्या मधून गाळ काढणे प्लास्टिक काढणे असे विविध उपक्रम पावसाच्या अगोदर राबवत असते. मुंबईसारख्या शहरांमध्ये प्रत्येक ठिकाणी काँक्रीटिंग झाल्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा ,सांगली ,कोल्हापूर मध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. बचाव कार्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. बाबी त्यांच्या घरी पुन्हा उभारणे नुकसानीचे पंचनामे करणे शेतकऱ्यांना दिलासा देणे हे काळाची गरज आहे. हिमाचल प्रदेश व उत्तराखंड यामध्ये आलेल्या भयंकर घटनेनंतर महाराष्ट्रात आलेल्या या पूरस्थितीचे ठोटावत याचे भान ठेवले पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळात भयंकर परिस्थिती निर्माण होईल.