सत्कार समारंभ
सार्वजनिक गणेशोत्सव २०२४’ मधील उत्कृष्ट गणेश मंडळांना “विघ्नहर्ता” पुरस्कार प्रदान!

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- २०-०८-२०२५
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘सार्वजनिक गणेशोत्सव २०२४’ मधील उत्कृष्ट गणेश मंडळांना “विघ्नहर्ता” पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मंगळवारी पार पडला. या कार्यक्रमात विविध गटांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.