रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी व सावित्री आणि कुंडलिका नदीने इशारा पातळीवर ओलांडली.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील :- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- १९-०८-२०२५
महाराष्ट्रात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे. अनेक जिल्ह्यात सकल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज मुंबईतील रेल्वे लाईन सुद्धा किमान ५ तास बंद होते. त्यामुळे सामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे १२जणांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत तसेच शासनामार्फत बचाव कार्य सुरू आहे.
आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शाळांना सुट्टी होती पण काही निमशासकीय कार्यालय यांना सुट्टी होत्या तर बहुतांश नियम शासकीय कार्यालय सुरू होती. या ४ दिवसात पावसाने कहरच केला आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे जात आहे. रोहा येथील आंबा नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदी इशारा पातळीवर आणले आहे. पातळगंगा नदी इशारा पात्र पेक्षा कमी आहे. कर्जत येथील इशारा पातळीपेक्षा कमी आहे. पनवेल येथील गाडीमध्ये इशारा पातळीपेक्षा कमी आहे. सदरचा अहवाल १९ ऑगस्ट २०२५ दुपारी ५ वाजेपर्यंत चा आहे. रायगड जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.