नवी मुंबई व रायगड जिलह्यात मुसळधार पावसाचा कहर.

दैनिक झुंजार टाईम्स.
महेंद्र माघाडे. प्रतिनिधी- उलवे-नवीमुंबई
दिनांक:- १९-०८-२०२५
पनवेल:- मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. ठाणे–पनवेल एक्सप्रेसवे परिसर, उरण, ऊलवे, सानपाडा, जुईनगर व खांदा कॉलनी येथे पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई व रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत हवामान खात्याने हाय टाईड जाहीर केला आहे. पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून, गाड्या उशिराने धावत आहेत. रुळांवर पाणी साचल्याने गाड्यांना तासाभराचा विलंब होत आहे. दरम्यान, रस्त्यांवरही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे.
काही भागात वाशीनाका अशोक नगर येथे भुसख्लन होउन घरांचे नुकसान झाली आहेत.
मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.रस्त्यावर वाहने घसरु लागले आहेत. बस,ट्रेन, टॅक्सी,आटोरिक्शा आणि इतर वाहने सुद्धा खुप कमी प्रमाणात धावत आहेत, नागरीकांनी घरी जाताना आपला प्रवास काळजीपूर्वक करा.शक्य असेल तर घराबाहेर पडू नका. आपण सुरक्षित तर आपला परीवार सुरक्षित. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या असे दैनिक झुंजार टाईम्स कडुन सांगण्यात येत आहे.