आजीवली येथील गोकुळ कॉम्प्लेक्स मध्ये स्वातंत्र्य दिन व जन्माष्टमी उत्साहात साजरा!

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- १८-०८-२०२५
पनवेल:- आजीवली तालुका पनवेल येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ध्वजारोहण आनंदवन सोसायटीच्या सदस्य सिंधूताई जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास गोकुळ मधील महिला पुरुष लहान मुले यांचा पावसाची रिपरिप असताना सुद्धा मोठा सहभाग होता.
राम मंदिरामध्ये लहान मुलांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणे केली. त्यानंतर गोकुळ कॉम्प्लेक्स मधील स्वातंत्र्य दिना विषयी मनोगत व्यक्त केली. काही नागरिकांनी चॉकलेट आणले होते, तसेच गोकुळ कॉम्प्लेक्स च्या वतीने चहा पाण्याची सोय केली होती. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्यांचे आभार मानले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी गोकुळ कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी राम मंदिरात जन्माष्टमी साजरी केली. यामध्ये महिलांनी श्रीकृष्णाचा पाळणा सजवून सायंकाळी दहा नंतर भजन केले. तसेच ठीक बारा वाजता श्रीकृष्णाला पाळण्यात घालून पूजा केली व पाळणा बोलून जन्माष्टमी साजरी केली. या कार्यक्रमात गोकुळ मधील महिला , पुरुष विशेषत लहान मुलांनी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान केले होता. त्यामुळे कार्यक्रमाला वेगळे स्वरूप आले. भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.