सण उत्सव

“नमस्ते सदा वत्सले मातृभूमे” भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

साबीर शेख मित्र परिवार संपादक:सामन्य नागरीक तथा भाजप प्रदेश सदस्य.

दैनिक झुंजार टाईम्स 

साबीर शेख:- पनवेल प्रतिनिधी 

दिनांक:- १५-०८-२०२५

देशभक्ती उत्साह,एकता ,राष्ट्राभिमानाची भावना निर्माण करणारा क्षण..आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील 

 

आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील जनसेवा कार्यालय येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. दीपक फर्टिलायझरचे एच.आर. हेड जयश्री काटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या नॅशनल सायकलिंग कोच अमृतसिंग , कोकण म्हाडा मा.सभापती बाळासाहेब पाटील, मा. विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, जयंत पगडे, अनिल भगत, तेजस कांडपिळे, सुरेखा मोहकर, प्रीती जॉर्ज, पत्रकार विजय कडू, पत्रकार संजय कदम,उदयोजक मयुरेश किस्मतराव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

आमदार विक्रांत पाटील यांनी अप्पर तहसील कार्यालय, पनवेल येथे राष्ट्रीय ध्वजास वंदन केले . या प्रसंगी अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे, नायब तहसीलदार संभाजी शेलार, इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर परिसरातील हरितीकरणासाठी वृक्षारोपण करण्यात आले. या सोहळ्यातील देशभक्तीचा उत्साह, सामाजिक एकजूट आणि राष्ट्राभिमानाची भावना सर्वांच्या मनात नवी ऊर्जा निर्माण करणारी ठरला यानिमित्ताने अनेक मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला .

तसेच पनवेल महानगरपालिकेत स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण सोहळा साजरा करीत राष्ट्रीय ध्वजाला वंदन करून हुतात्म्यांच्या त्यागाचा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा सन्मान करण्याची संधी लाभलाच समाधान व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आयुक्त मंगेश चितळे, सर्व उपायुक्त, सहआयुक्त, कर्मचारीवृंद आणि नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button