सण उत्सव
यावर्षी २०२५ रक्षाबंधनला राहूच संकट…. जाणून घ्या मुहूर्त!

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०६-०८२०२५
हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यात पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते. रक्षाबंधन हा सण भावनिक आणि पवित्र सण जो भाऊ बहिणीच्या नात्यामधील जबाबदारीचे प्रतीक आहे. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीच्या आरक्षणाची प्रतिज्ञा करतो.
यावर्षी ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी केली जाईल भाऊ मनाचे प्रेमाचे प्रतीक असलेला हा मोठा सण मोठ्या आदराने केला जातो. तो साजरा करण्यासाठी सर्वात आधी भद्रकाल साजरा केला जातो. यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राची सावली नसेल, तर राहू काल असेल जो राखी बांधण्यासाठी शुभ नाही.
पंचांगानुसार राहू काल ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १०.३० वाजेपर्यंत असेल अशा परिस्थिती या दीड तासात भावाला राखी बांधू नका.