सत्कार समारंभ

चक्रधर स्वामी अवतार दिन मुंबईत यशस्वीपणे साजरा केला.

ऐतिहासिक अविस्मरणीय सोहळा : चक्रधर स्वामी अवतार दिन मुंबईतील १८ मंडळांनी यशस्वीपणे साजरा केला.

दैनिक झुंजार टाईम्स 

दत्तू ठोके:- मुंबई प्रतिनिधी 

दिनांक:- २७-०८-२०२५

मुंबई : सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार  मुंबई शहरातील १८ मंडळांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात, भक्तीभावात आणि ऐतिहासिक स्वरूपात संपन्न झाला.

या सोहळ्याची भव्यता, शिस्तबद्ध आयोजन व भक्तीमय वातावरणामुळे हा उत्सव अविस्मरणीय ठरला. विविध मंडळांनी एकत्र येऊन समाजातील ऐक्य, एकोप्याचे दर्शन घडवले आणि संतपरंपरेच्या संदेशाला मूर्त रूप दिले.

भजन, कीर्तनकार , प्रवचन, प्रबोधन या कार्यक्रमांतून चक्रधर स्वामींचे विचार, तत्त्वज्ञान आणि त्यांचा अद्वितीय समाजप्रेमी संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला. मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी एकात्मतेचा अनुभव घेतला व संतांचा आशीर्वाद लाभला.

या यशस्वी आयोजनासाठी १८ मंडळांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि भक्तीभावामुळे हा अवतार दिन ऐतिहासिक ठरला असून भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देणारा ठरेल.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब, प्रतापराव सरनाईक, किशोर आप्प्पा पाटील, इत्यादी मंत्री उपस्थित

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button