आपत्कालीन व्यवस्थापन
मोनोरेल बिघाडामुळे प्रवासी अडचणीत.

दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- मुंबई प्रतिनिधी.
मुंबई : मंगळवार दिनांक १९ऑगस्ट. मुंबईत मोनोरेल सेवेचा आज मोठा खोळंबा झाला. म्हैसूर पार्क ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल अचानक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सुमारे दोन तासांपासून मोनोरेल थांबून राहिल्याने प्रवासी गुदमरले.
अग्निशमन दलाच्या ताफ्याने घटनास्थळी धाव घेत तीन क्रेनच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू केले. घाबरलेल्या प्रवाशांनी दरवाजे फोडण्याचा प्रयत्न केला. अखेर दोन क्रेनच्या मदतीने काही प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवण्यात आले.
महानगरपालिकेची वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली असून प्रवाशांना प्राथमिक उपचार दिले जात आहेत. तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेल सेवा ठप्प झाली असून अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही.
आतापर्यंत १० ते १२ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून उर्वरित प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.