पवईतील महात्मा ज्योतिबा फुले नगरमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
सलग ४५ वर्ष ध्वजारोहण करणाऱ्या स्वर्गीय भास्करराव काकडे व त्यांच्या पत्नी कमल काकडे यांना वाहण्यात अली श्रद्धांजली.

दैनिक झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- मुंबई प्रतिनिधी
दिनांक:- १६-०८-२०२५
पवई महात्मा ज्योतिबा फुले नगर मधील ओम साई एकता सोसायटी व जय भवानी मित्र मंडळच्या आवारात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याठिकाणी सलग ४५ वर्ष ध्वजारोहण करणाऱ्या स्वर्गीय भास्करराव काकडे व त्यांच्या पत्नी कमल भास्करराव काकडे यांचे जानेवारी महिन्यात ०६ दिवसाच्या अंतराने निधन झाले त्यांच्या आठवणींना उजाळा व स्मरण म्हणून म्हणून सोसायटीतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.
स्वर्गीय कमल व भास्करराव काकडे हे येथील जुने रहिवाशी होते. जानेवारी २०२५ मध्ये अवघ्या सहा दिवसाच्या अंतराने दोघांचेही निधन झाले होते.
त्यांच्या निधनानंतर आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्वर्गीय भास्करराव काकडे यांचे सुपुत्र अनिल भास्करराव काकडे यांना ध्वजरोहण करण्याची विनंती दोन्ही ठिकाणी करण्यात आली मात्र मि लहान आहे हा मान वरिष्ठ्छांचा आहे असं सांगत जितू सावंत व भुवड साहेब यांना ध्वजारोहण करण्याची विनंती केली.
माझ्या वडिलांना ४५ वर्ष ध्वजारोहण करण्याचा मान दिल्याबद्दल अनिल काकडे यांनी ओम साई एकता सोसायटीचे वरिष्ठ नागरिक जितू सावंत व जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश घडशी यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी विभागातील वरिष्ठ नागरिक सियाराम यादव, ओमसाई एकता सोसायटीचे जितू सावंत,जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश घडशी, नितीन बोर्डे आणि मित्र मंडळी उपस्थित होते.