जाहिर निमंत्रण! जाहिर निमंत्रण!! जाहिर निमंत्रण!!!

दैनिक झुंजार टाईम्स
प्रमिलाताई बाळासाहेब आढांगळे:- मुंबई प्रतिनिधी.
दिनांक:- ०९-०८-२०२५
राहुल नगर, वाशीनाका, आर. सी. मार्ग, चेंबूर , मुंबई – ४०० ०७४ या ठिकाणी श्री संत कबीर ग्रंथालय आणि वर्षावास संघ , राहुल नगर यांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून तीन महिने ( सलग ९० दिवस ) रोज रात्री ८ ते ९.३० या वेळेत वर्षावास कार्यक्रम राबविला जात आहे.
कार्यक्रमात बुद्ध वंदना , प्रबोधन गिते, ग्रंथ वाचन, विविध विषयी व्याख्याने, इंग्लिश स्पिकिंग क्लास, असे अनेक कार्यक्रम राबवून समाजात परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न होत आहे.
परिसरात बुद्ध धम्म व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची चळवळ गतीमान करण्याचा अगदी सातत्यपुर्ण प्रयत्न केला जात आहे.
कार्यक्रम अधिक प्रभावी, एकसंघ व सर्व बाजूने प्रगतशील समाज घडविण्याच्या दृष्टीने पुढे पुढे जात आहे.
वर्षावास कार्यकमाचा भाग म्हणून या वर्षी शनिवार दिनांक ९ ऑगष्ट २०२५ रोजी, संध्याकाळी ७.३० वाजता, राहुल नगर येथे एका विशेष कार्यकमाचे आयोजन केले आहे.
कार्यकम
विश्वातली सर्व सुखं ज्यांच्या पायावर लोटांगण घेत आहेत, तरीही त्यातच गुरफटून न जाता किंवा ऐयाशी जिवन न जगता ज्यांच्या पुण्याईने, त्यागाने हे वैभव प्राप्त झाले आहे त्या महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दीनदुबळ्या समाजाची आई त्यागमुर्ती माता रमाई यांनी समाजाच्या जडणघडणीसाठी केलेल्या त्यागाची जाणीव मनी बाळगून, त्यांच्या न फिटणाऱ्या ऋणाची आठवण ठेऊन आयुष्य जगता जगता समाजाच्या उन्नतीसाठी, बुद्ध धम्म आणि डॉ. बाबासाहेबांचे विचार पेरण्याचे काम अविरतपणे जे करीत आहे ते…, ज्यांनी माता रमाईच्या कुंकवात तेहतीस करोडच्या हिऱ्यांचा वापर केला ते….. व ज्यांनी माता रमाईसाठी एकोनचाळीस करोडची साडी तयार केली ते…
सन्माननीय रोहित पिसाळ
( पिसाळ ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक… क्षुषा सोन्याच्या कपड्यांचे मालक… सोन्याचे खाण कामगार… बौद्ध संरक्षण.. जगातील सर्वात मोठ्या पुस्तकाचे लेखक थेरीगाथा.. वर्ण संस्था डीकोडिंग.. ) हे राहुल नगर येथे वर्षावास कार्यक्रमात उपस्थित राहून विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
तेव्हा या कार्यक्रमास आपण आपल्या कुटूंबासहीत, सहकार्यांसहीत आवर्जून उपस्थित रहावे असे आपणास विनम्र आवाहन करण्यात येत आहे. अवश्य यावे. ही विनंती.
परिसरातील ज्या ज्या बुद्ध विहारात वर्षावास कार्यक्रम चालू आहे तेथील सर्व उपासक, उपासिकांनी व कार्यकर्त्यांनी पांढरे शुभ्र वस्त्रे परिधान करून कार्यक्रमास अवश्य यावे ही विनंती. श्री संत कबीर ग्रंथालय व वर्षावास संघ राहुल नगर.