दुष्मी खारपाडा येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी हनुमान बाबू घरत यांची बिनविरोध निवड..!

दैनिक झुंजार टाईम्स
कैलासराजे घरत:- पेन प्रतिनिधी
दिनांक:- २०-०८-२०२५
बुधवार दिनांक २०-०८-२५ रोजी झालेल्या दुष्मी-खारपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी हनुमान बाबू घरत यांची व सदस्यपदी अनुक्रमे रत्नाकर काशीराम घरत, भारती मनोहर पाटील, पत्रकार कैलास कमलाकर घरत या सर्वांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीसाठी गावातील ज्येष्ठ विधीज्ञ मनोहर पुंडलिक पाटील, मा. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बाळकृष्ण घरत व शेतकरी संघटनेचे सर्व सक्रिय सदस्य यांच्या परिश्रमाने व कल्पकतेने हनुमान बाबू घरत यांची समाजाप्रती असणारी बांधिलकी व मनमिळाऊ स्वभाव आणि गावाप्रती असणारी त्यांची सामाजिक बांधिलकी, सेवाभावी वृत्ती या सर्व गोष्टींमुळे आज त्यांना गावाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल त्यांचे सर्व ग्रामस्थांनी, दुष्मी खारपाडा ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच नेत्राताई महेंद्र घरत व सर्व सन्माननीय सदस्य, ग्रामविकास अधिकारी अर्चना थळे यांनी या सर्वांच्या निवडीचे स्वागत करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शेतकरी संघटनेचे जेष्ठ विधीज्ञ मनोहर पुंडलिक पाटील, मा.डॅशिंग सदस्य प्रशांत बाळकृष्ण घरत ग्रामपंचायतीच्या सरपंच नेत्रा महेंद्र घरत व सदस्या राजश्री नितीन घरत, माजी उपसरपंच संजय मंगळ्या घरत, निशाकर घरत, विनायक कोळी, रूपाली पाटील, सौ.अनिता भगत तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कमळाकर बाबू घरत, देवीदास रामा घरत, रघुनाथ नारायण घरत, राज दत्तात्रय घरत, समाजसेवक महेंद्रदादा चंद्रकांत घरत, गजानन हसुराम घरत, रवींद्र लक्ष्मण ठाकूर, राजेश गोपीनाथ पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दुष्मी खारपाडा महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी हनुमान बाबू घरत यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.