विकास शिरसट (आण्णा) यांची शिराळा तालुका पोलीस संघटनेच्या अध्यक्षपदी निवड.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक:- २०-०८-२०२५
सावंतवाडी पैकी माळवाडी तालुका – शिराळा येथील विकास शिरसट (आण्णा) यांची शिराळा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या तालुकाध्यक्ष निवड करण्यात आली
याप्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष मा. बाळासाहेब शिंदे – पाटील आणि सातारा पोलीस स्टेशनच्या डी वाय एस पी मा. वैशाली कडूकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सामाजिक कार्याचा वसा असलेल्या विकास शिरसट यांना पहिल्यापासूनच समाजसेवेची आवड आहे. आपला उद्योग व्यवसाय सांभाळात पोलीस पाटील पदाची धुरा सांभाळत शिराळा तालुक्यात अनेक प्रश्न मार्गी लावले. याच कामाची पोचपावती म्हणून म्हणून त्यांची शिराळा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीतून त्यांचा शिराळा, शाहूवाडी, पाटण आणि कराड या तालुक्यातून आण्णा यांचा मित्रपरिवार हितचिंतक आणि मेणी खोरा ग्रामस्थांच्याकडून कौतुकांचा वर्षात होत आहे….
आता सद्या त्यांच्याकडे संपूर्ण मेणीखोऱ्याचा पदभार आहे…..