
दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक ०८-०८-२०२५ रोजी भिकू दाजी पाटील यांचे आकस्मित निधन झाले. या निधनाची बातमी जिंती पासून मुंबई पर्यंत वाऱ्यासारखी पोहोचली आणि एक काळजाचा ठोका चुकला. सर्वजण २ मिनिट निशब्द झाले. पुणे,मुंबई व ईतर ठिकाणावरून येणाऱ्यांची विचारपूस करत होते ते आता कायमचं बंद झाले.
भिकू दाजी पाटील यांचा जन्म शेतकरी कुटुंबात सन १९६० झाला. वडील शेतकरी असल्याने फारसे उत्पन्न शेतीमध्ये मिळत नव्हते त्यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईची गाठ धरली. त्यांनी मुंबईमध्ये अखिल भारतीय माथाडी युनियन मध्ये काम करण्यास ठरवले. मुळातच गावाकडे पैलवान की केल्यामुळे धष्ट, पुष्ट असल्याने या कामांमध्ये तरबेज झाले. कष्ट व जिद्दीच्या जोरावर त्यांनी घरचा गाडा सांभाळत आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले. श्री संताजी भिकू पाटील यांचे ते वडील आहेत. त्यांचा मुलगा फॉरेन्सिक क्लब पुणे या ठिकाणी वर्ग १अधिकारी आहे व सून सुद्धा पुणे या ठिकाणी वर्ग २ अधिकारी आहे.
भिकू दाजी पाटील यांचा रक्षाविसर्जन कार्यक्रम दिनांक ०९-०८-२०२५रोजी सकाळी ९.३० वाजता जिंती येथे होणार आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.