महाराष्ट्र ग्रामीण
तातोबा पवार यांना मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर!

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक:- ०२-०८-२०२५
धोंडेवाडी तालुका कराड येथील श्री तातोबा पवार यांना यापूर्वी अनेक पुरस्कार प्रदान झाले आहेत. यांचे सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीने कार्याला आले आहे. सामान्य जनतेची असलेली नाळ कायमस्वरूपी सामान्य लोकांच्या मनात असते. वैद्यकीय अडचण निर्माण झाल्यास श्री तातोबा पवार यांचे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात घेतले जाते.
अनेक पुरस्कार मिळून सुद्धा कोणताही मोठेपणा न बाळगता सामान्य जनतेचे काम ते करतात. त्यामुळेच त्यांना मेजर ध्यानचंद महाराष्ट्र केदारनाथ पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण २९ऑगस्ट २०२५ रोजी राजश्री शाहू छत्रपती सांस्कृतिक भवन दसरा चौक,कोल्हापूर येथे होणार आहे. या पुरस्काराने कराड तालुक्यातील मित्रपरिवार ,हितचिंतक, धोंडेवाडी ग्रामस्थ यांच्याकडून कौतुकाचा वर्ष होत आहे.