रक्षाबन्धनस्य शुभाशया:”शेकाप लाल बावटा योद्धांना लाडक्या बहिणीनं कडून औक्षण.
अतूट नात्याचा सण ..माजी आमदार बाळाराम पाटील.

दैनिक झुंजार टाईम्स
साबीर शेख:- पनवेल (कामोठे)प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी जपणारा लाडका भाई म्हणून प्रचलित गौरव पोरवाल मित्र परिवाराला कामोठेकरांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाडक्या बहीणच रक्षा बंधन औक्षण ,”भवतु ते दीर्घमायु: सुखसम्पदन्वितं। रक्षाबन्धनसन्देशं स्वीकुरु सस्नेहम्॥” या श्लोका नुसार यावेळी संवेदनशील लोक नेतृत्व माजी आमदार बाळाराम पाटील,कामोठे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल,शेकाप पदाधिकारी रमेश गोरे ,नितीन पगारे आदी पोरवाल मित्र परिवार उपस्थित होते .कामोठे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे ,एम,एस, सी,बी अभियंता जयश्री काळे,
लायन्स क्लब सदस्या, प्रजापती ब्रह्मा कुमारी सदस्या तसेच शहर,संघटना,आरोग्य दूत,सेविका ,विविध क्षेत्रातील व्यापारी महिला,संस्थेच्या वतीने लाडका भाऊ गौरव पोरवाल मित्र परिवाराला रक्षा बंधनाच्या निमित्ताने भावी लोकप्रतिनिधी लोकसेवक लाल बावटा योध्दा म्हणून खूप खूप शुभेच्छा दिल्या.
हा सण उत्सव स्त्री सन्मान करून ऋण व्यक्त करणारा असून आम्हा सर्वांना त्यांच्या सुरक्षेची जाणिव करून देणारा आहे असे सांगून गौरव पोरवाल यांनी सर्वांना शेकाप व मित्र परिवाराच्या वतीने रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.