राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची रायगड जिल्हा संवाद बैठक उत्साहात पार पडली.

दैनिक झुंजार टाईम्स
उरण (प्रतिनिधी)
दिनांक:- २८-०७-२०२५
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची रायगड जिल्हा संवाद बैठक रविवार, दिनांक २७ जुलै २०२५ रोजी उरण तालुक्यातील बेलपाडा येथील सरस्वती मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. उरणच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोषात स्वागत केले. भविष्यातील दिशा, कार्यपद्धती, संघटनात्मक वाढ आणि कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण यावर भर देत ही बैठक ऐतिहासिक ठरली.
बैठकीची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण व मानवंदना देऊन करण्यात आली. यानंतर उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शाल, शश्रीफळ व फुलांच्या गुच्छांनी सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष सन्मान
संघामध्य उत्कृष्ट कार्यगिरी करणाऱ्या उरण तालुका कार्याध्यक्ष प्रवीण नाईक आणि उरण तालुका संघटक अलंकार कडू रायगड जिल्हा संघटक उमाजी मंडले यांना संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढागळे यांच्या हस्ते गोड मेडल देऊन विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
याच दिवशी संघटक अलंकार कडू यांचा वाढदिवस असल्याने उपस्थितांनी केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या. सभागृहात आनंदी वातावरण निर्माण झाले.
नवीन नियुक्त्या व मार्गदर्शन
या बैठकीचे अध्यक्षस्थान संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी भूषवले. त्यांनी विविध जिल्ह्यांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करून संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या. यावेळी बोलताना त्यांनी संघटनेच्या कार्यशैलीसंबंधी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात म्हटले, “संघटनेत १०० पदाधिकाऱ्यांपेक्षा ५ निष्ठावंत पदाधिकारी महत्त्वाचे असतात.” त्यांनी निष्ठा, सक्रियता आणि स्वच्छ उद्दिष्टे यांची गरज अधोरेखित केली.
महत्त्वाचे निर्णय आणि समित्यांची स्थापना
बैठकीत पुढील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:
🔸 तक्रार निवारण समिती
🔸 पत्रव्यवहार व कामकाज समिती
🔸 संघटना वाढ विशेष समिती
या समित्यांद्वारे संघाचे काम अधिक गतीने, पारदर्शकपणे आणि संघटनात्मक दृष्टिकोन ठेवून राबवले जाईल, असे ठरविण्यात आले.
प्रश्नोत्तर व संवाद सत्र.
बैठकीच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी आपले प्रश्न, शंका, सूचना मांडल्या. सर्वांच्या भावना जाणून घेण्यात आल्या व चर्चेच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटक संदीप ठाकूर यांनी तर आभार प्रदर्शन उरण तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे, अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव प्रितमसिंग चौहान, रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले, सचिव राजपाल शेगोकार, कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, उपाध्यक्ष अमोल पाटील, सहसचिव महेंद्र माघाडे संपर्कप्रमुख दत्तू ठोके, संपर्कप्रमुख गणेश पराड, संघटक उमाजी मंडले, प्रसिद्धिप्रमुख हेमंत देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष प्रमोद म्हात्रे, सचिव प्रतिकेश पालकर, कर्जत तालुका अध्यक्ष भालचंद्र गायकवाड, संपर्कप्रमुख सुनील जाधव, उरण तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण नाईक, सचिव मंगेश कोळी, उपाध्यक्ष सुनील जोशी, संघटक अलंकार कडू, प्रसिद्धिप्रमुख दयानंद घरत, अन्याय अत्याचार निवारण समितीच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी ठाकूर, नवी मुंबई शहर अध्यक्षा आशा ढसाळ, व ठोणे आणि मुंबई येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.