शैक्षणिक
विनाअनुदानित शिक्षकांना २०% पगारवाढीची भेट.

दैनिक झुंजार टाईम्स
राजपाल शेगोकार:- मुंबई प्रतिनिधी
दिनांक:- १०-०७-२०२५
मुंबई – विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या पगार वाढीचा मुद्दा मागिल काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी ०८-०७-२५ पासून तिव्र आंदोलन छेडले होते. आझाद मैदानावरील विनाअनुदानित शिक्षकांच्या तीव्र आंदोलनाला अखेर यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत या शिक्षकांच्या पगारात २० टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानावर शिक्षकांशी संवाद साधताना हा निर्णय जाहीर केला. शिवाय, १८ जुलैपर्यंत ही वाढीव रक्कम शिक्षकांच्या बँक खात्यांत जमा होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.