सांगली जिल्ह्यातील रेड गावचा लाल मातीतील हिरा हरपला.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड प्रतिनिधी
दिनांक:- २९-०७-२०२५
सांगली जिल्ह्यातील रेड तालुका शिराळा येथील कै. पै. शिवाजी कृष्णा जाधव यांचे आकस्मित दुःखद निधन झाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या कुस्ती क्षेत्रातील एक नामवंत पैलवान, सांगली जिल्हा तालीम संघाचे जेष्ठ सदस्य , शिराळ तालुका तालीम संघाचे उपाध्यक्ष, रेड गावचे माजी उपसरपंच व शिवछत्रपती तालीम संघ रेड गावचे संस्थापक यांचे निधन झाले. रेड गावामध्ये अनेक मल्य तयार केले. सांगली जिल्ह्यातील अनेक कुस्ती मैदानामध्ये नाव केले आहे. कुस्ती क्षेत्रात सांगली सातारा कोल्हापूर जिल्हासह पश्चिम महाराष्ट्रात त्यांना मानणारा वर्ग असल्यामुळे पैलवानांच्या मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. रेड गावातील तरुण पिढीला निर्व्यसनी घडवण्याचे चांगले काम त्यांनी केले आहे. गावातील त्यांच्या मार्गदर्शनामुळे पोलीस, फौजी व शासकीय अधिकारी घडवण्याचे काम त्यांनी केले आहे.
रेड गावातील सुप्रसिद्ध पैलवान विक्रम जाधव व पैलवान विशाल जाधव यांचे ते वडील आहेत. त्यांचा रक्षा विसर्जन विधी गुरुवार दिनांक ३१-०७-२०२५रोजी सकाळी ९.३० वाजता रेड तालुका शिराळा या ठिकाणी आयोजित केला आहे. कराड तालुका कुस्ती संघटना व कुस्ती क्षेत्रातील सर्व आज माझी पैलवान, वस्ताद मंडळी त्यांच्या दुःखात दुःखात सहभागी आहेत तसेच महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकीन कडून कै. पैलवान शिवाजी जाधव यांच्या पवित्रा आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना……