परशुराम माळी यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळे वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांनी केला यथोचित सन्मान.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक :- १४-०७-२०२५
आजीवली तालुका पनवेल येथील परशुराम नथुराम माळी यांना शाहीर अण्णाभाऊ साठे कला महोत्सव २०२५ यांच्यातर्फे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ३ ऑगस्ट २०२५ रोजी उल्हासनगर येथे संपन्न होणार आहे. गेली पंधरा वर्षे धार्मिक कार्यात अजिवली येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंडळ पनवेल यांच्यामार्फत विशेष संकल्पना राबवून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायातील आजीवली येथील हरिनाम सप्ताह महाराष्ट्रभर पसरवला आहे, त्यामुळे हरिभक्त पारायण नामदेव शास्त्री यांनी त्यांच्यावर कौतुकाची थाप मारली आहे. काही काळ गावचे उप सरपंच पद उपभोगल्यामुळे गावाला सामाजिक व शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे काम केले आहे.
१५ वर्षे सतत वारकरी संप्रदायात काम करताना मोलाचा वाटा उचलला आहे याच कामाची पोचपावती पुरस्काराने मिळाली आहे. आजीवली व आजूबाजूच्या परिसरातील वारकरी संप्रदायाने त्यांचा मोरया ऑनलाईन झेरॉक्स आजीवली यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन ह भ प. आदरणीय जनार्दन महाराज सार्डेकर व ह भ प.आदरणीय. जगदिश महाराज सार्डेकर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकामध्ये पत्रकार अमोल पाटील यांनी पंधरा वर्षे केलेल्या कामाची पोहोच पावती मिळाली, वारकरी संप्रदायात मोलाचा वाटा उचलला धार्मिक कार्यात निस्वार्थपणे सेवा करणारा अवलिया पनवेल करांना लाभला तसेच या कार्यक्रमास उपस्थित उपस्थितांचे आभार मानले असे ते बोलले.
सार्डेकर महाराज बोलले परशुराम अण्णा यांनी पायी दिंडी आजीवली ते आळंदी पहिल्यांदा चालू केली . धार्मिक कार्यात निस्वार्थपणे सेवा केली आहे. गोरगरिबांना पडत्या काळात मदत केली आहे असे ते बोलले.
या कार्यक्रमामध्ये पत्रकार अमोल पाटील , विकास जाधव श्री संत ज्ञानेस्वर माऊली अखंड हरिनाम सप्ताहचे अध्यक्ष– ह.भ.प. विश्वनाथ महाराज पाटिल (अरिवली) ; ह.भ.प. राजू पाटील (आरवली) , ह.भ.प. दिनेश (बाबु शेठ) पाटिल ( सांगाडे गाव) , ह.भ.प. शशिकांत दूंदया गोजे (अरिवली गाव).आदी मान्यवर उपस्थित होते. या सन्मानाची चर्चा आजीवली व इतर परिसरांमधून होत आहे व हितचिंतकांनी कौतुकाचे थाप दिली आहे.