आजीवली येथील गोकुळ मध्ये गरजला विठ्ठल नामाचा आवाज.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०७-०७-२०२५
रविवारी आषाढी एकादशी निमित्त गोकुळ कॉम्प्लेक्स मधील राम मंदिरात भक्ती भावाने अभंग, गवळणी, भजन सर्व महिला व पुरुष वर्गांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पारंपरिक वेशभूषा मध्ये लहान मुले व मुले परिधान केले होते. त्यामुळे कार्यक्रमाचे शोभा अजून वाढली होती.
विठ्ठल भक्तांनी या कार्यक्रमात विठ्ठल नामाचा गजर करत भक्ती गीतानी मंदिर परिसर दुमदुमला. आजूबाजूच्या सहकारी सोसायटी मधील विठ्ठल भक्तांनी सुद्धा या कार्यक्रमास प्रतिसाद देत कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.
पुरुष मंडळी सुद्धा पारंपारिक वेश परिधान करून विठ्ठल भक्तिमय वातावरणात लीन झाले होते. सूरपेटी, तबला, टाळ हा मृदंगाच्या सुरात विठ्ठल भक्तांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले होते. अनेक वयोवृद्ध भक्त सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमात चहापान, प्रसाद म्हणून केळी वाटप भक्तांनी केले. भक्तिमय वातावरणात परिसर दुमदुमला व गोकुळ मधील वातावरण भक्तिमय झाले. या कार्यक्रमाची सांगता महिलांनी फुगड्या खेळून केली. गोकुळ कॉम्प्लेक्स मधील सर्वांनी भक्तिमय वातावरणाचा आनंद घेत कार्यक्रमाची समाप्त केली. पहिल्याच वर्षी आषाढी एकादशी निमित्त केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक गोकुळ कॉम्प्लेक्स व आजूबाजूच्या परिसरात होत आहे.