आजीवली येथील श्री परशुराम माळी यांना राज्यस्तरीय जगदगूरू संत तुकाराम महाराज पुरस्कार जाहीर!

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०९-०७-२०२५
आजीवली तालुका पनवेल येथील परशुराम नथुराम माळी गेली २५ वर्षे सामाजिक व वारकरी संप्रदायात काम करीत आहेत. आजीवली येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळ आजीवली येथे न भूतो न भविष्य असे तत्पुरती धार्मिक कार्य केले आहे. धार्मिक कार्यात आपला मोठा सहभाग असल्यामुळे आपणास ह. भ. प. श्री परशुराम नथुराम माळी या नावाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे ह.भ. प. नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी कौतुकाची थाप दिली आहे.
आजिवली हे गाव संतांची भूमी असलेले गाव आहे.आपण काही काळ आजीवली येथील सरपंच असताना सामाजिक व शैक्षणिक अडचणी सोडवून गावाला एक वेगळी दिशा देण्याचे काम केले आहे. गोरगरीब जनतेला अडचणीच्या काळात मदत केली आहे. आपण धार्मिक कार्यात मदतीचा हात नेहमीच पुढे असतो. आपण चांगल्या कामात नेहमीच पुढाकार असतो.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला महोत्सव २०२५ मध्ये ३ ऑगस्ट रोजी टाऊन हॉल, उल्हासनगर ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये आजीवली तालुका पनवेल येथील परशुराम नथुराम माळी यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे २०२५ मध्ये होणाऱ्या महोत्सवा मध्ये जगदगूरू संत तुकाराम महाराज पुरस्कार या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी राज्यातील अनेक राजकीय मंडळी, सामाजिक मंडळी, सिने अभिनेते, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे श्री परशुराम माळी यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.