ओबीसी जनमोर्चाच्या मुंबई विभाग कमिटीची बैठक संपन्न, मुंबई विभाग अध्यक्षपदी अरविंद डाफळे तर सरचिटणीस पदी प्रा.रोशन चव्हाण यांची नियुक्ती.

दैनिक झुंजार टाईम्स.
महेंद्र माघाडे:- पनवेल-नवीमुंबई प्रतिनिधि.
शनिवार,दिनांक. १९.जुलै २०२५
मुंबई. मुंबई विभाग ‘ओबीसी जनमोर्चा’ च्या बांधणीसाठी काही प्रमुख मान्यवर तसेच कार्यकर्ते यांची बैठक शुक्रवार दि. १८ जुलै २०२५ रोजी, संध्याकाळी ठीक ६.३० वाजता, कुणबी ज्ञाती गृह वाघे हॉल, परेल, मुंबई येथे जनमोर्चा कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला आगरी, कुणबी, तेली, भंडारी, नाभिक, धनगर समाज संघटना यांचे प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत कुणबी समाजोन्नती संघाचे सरचिटणीस कृष्णा वणे, सह सचिव प्रमोद खेराडे, राज्य समन्वयक माधव कांबळे, किरण डिके, राज्य कार्यकारणी पदाधिकारी संदेश मयेकर, अरविंद डाफळे, शांताराम दिघे, प्रकाश तोडणकर सर,प्रफुल्ल खानविलकर, दीपक म्हात्रे, अरुण पाटील, सुरेश पाटील, सुरेश मांडवकर, प्रकाश वालम,प्रविण पाटील, युवा सेक्रेटरी सचिन रामाणे, रोशन चव्हाण, असे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई विभाग अध्यक्ष म्हणून अरविंद डाफळे व सरचिटणीस म्हणून रोशन चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ओबीसी जनमोर्चा मुंबई कमिटी बांधणी तसेच पुढील काळात होणारी जातनिहाय जनगणना बाबत जनजागृती यासाठी हि बैठक महत्वपूर्ण होती.