राजेश सावित्री काशप्पा होट्टी यांचे सी . ए. परिक्षेत सुयश.

दैनिक झुंजार टाईम्स
नवी मुंबई:- प्रतिनिधी
दिनांक:-०८-०७-२०२५
नवी मुंबई : चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कळंबोली ,नवी मुंबई येथील राहणारा राजेश सावित्री काशप्पा होट्टी यांना यश मिळाले आहे
राजेश सीए ची परीक्षा पास होण्यास फक्त सहा वर्ष लागले त्याने प्रतिकूल परिस्थितीत असतानाही जिद्दीने अभ्यास केला व चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करून आई वडिलांचे स्वप्न साकार केले.
मुलाला सीए करायचा असा ध्यास त्यांच्या आई वडिलांचा होता त्यासाठी वडिलांनी अहोरात्र कष्ट केले. मुलानेही आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली यशासाठी संघर्ष करताना धीर सोडला नाही. अखेर आज त्याला उद्दिष्ट गाठण्यात यश आले आहे.
राजेश लहानपणासून जिद्दी आणि हुशार होता, राजेशने प्राथमिक शिक्षण कळंबोली येथे झाले. मुंबई विद्यापीठाच्या के एल कॉलेज मधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्या नंतर सी.ए. होण्याचा दृढनिश्चय केला. रात्रंदिवस अभ्यास करून ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मनाशी जिद्द बाळगली.
त्याच्या यशाने आई-वडिलांच्या आनंदासमोर गगन ठेंगणे झाले.त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या संदर्भात ही परीक्षा पास झालेला राजेश सावित्री काशप्पा होट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्याने सीए परीक्षा पास होण्यासाठी मला फक्त चार वर्ष लागले असल्याचे सांगितले सतत अभ्यास व परिश्रमाच्या जोरावर यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.