गुन्हेगारी

अतिभयंकर…..! पुणेमुंबई एक्स्प्रेसवर, लोणावळा टोल नाक्याजवळ कार चालक व मालकास बेदम मारहाण करत लुटमार…..!

दैनिक झुंजार टाईम्स

महेंद्र माघाडे. उलवे-नवीमुंबई प्रतिनिधी

दिनांक:- ११-०७-२०२५

पुणे – मुंबई एक्स्प्रेस हायवेवर मध्यरात्री २. वाजता कार चालकाला व मालकास मारहाण करुन पैसे लुटले.

सदर घटना अशी की बदली ड्रायव्हर कांतिलाल ओस्वाल यास घेऊन मालक गाडी क्रं. MH12 WE 8332 मोरीश गॅरेज कारने, ११जुलै रोजी मध्यरात्री २. वाजता पुण्यावरून मुंबई च्या दिशेने जात असताना एक कि.मी. लोणावळा टोलनाका आधी लुटारुंने त्यांच्या स्विफ्ट कारने ओव्हरटेक केले. व पाच-सहा जनांनी कार थांबवून मालक व कारचालक कांतिलाल ओस्वाल यांच्यावर जीवघेणा हल्ला करत, खाली पाडुन, 25 हजारा रूपयांपेक्षा जास्त रक्कम लुटण्यात आली आहे.

सदर भयंकर घटनेने मालक व कारचालक प्रचंड घाबरलेले असुन, त्यामुळे ते पोलिसांत सुद्धा, भितीपोटी तक्रार करण्यास समोर येत नाहीत.

मुंबईपुणे एक्स्प्रेस हायवेवर गाडी लुटण्याच्या प्रकारात वाढ झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावयाचा असल्यास गुन्हेगारांना शोधुन त्यांना कडक शिक्षा करुन कायदा-व्यावस्था सुरळीत राखायला हवी. एक्स्प्रेस हायवेवर लुटमारी चे प्रमाण वाढले असुन,पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे.

या भयंकर घटनेचा व सराईत गुन्हेगारांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना शिक्षा करुन,हनागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button