
दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील :- कराड प्रतिनिधी
दिनांक:- २८-०७-१०२५
कोल्हापूरच्या शाहू विजयी गंगावेश तालीमचे अत्यंत गुणी, मनमिळावू आणि लोकप्रिय पैलवान सचिन भाऊ जामदार यांचे अकस्मात निधन झाले आहे. या निधनाची बातमी भारतभर पसरतात कुस्ती क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आकस्मित झालेल्या निधनामुळे कुस्ती क्षेत्रातील पैलवान व त्यांचे सहकारी यांना मनाला चटका लावणारी बातमी कानावर आली आणि पैलवान क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्रभरच्या कुस्तीप्रेमींमध्ये प्रिय असलेले सचिन भाऊ, कुस्ती मैदानात अनेकदा एक नंबरच्या जोडीत लढत असत. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे राज्यभर त्यांनी मित्रपरिवार निर्माण केला होता.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे सामर्थ्य देवो. या दुःखात
कराड तालुका कुस्ती संघ व कला क्रिडा सांस्कृतिक ट्रस्ट , कराड तालुका कुस्ती संघटना त्यांच्या दुःखात सहभागी आहोत