महारुगडेवाडी येथील नागरिकांच्या तत्परतेमुळे विजेचा खांब हटवल्यामुळे वेळेआधीच अनर्थ टळला.

दैनिक झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- कराड(जिंती) प्रतिनिधी
जिंती उंडाळे हा रस्ता महारुगडेवाडी, आकाईवाडी, बोत्रे वाडी या सर्व गावांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे. महारुगडेवाडी हे गाव सर्व गावांच्या मध्यभागी असल्यामुळे सर्व ठिकाणी विद्युत प्रवाह प्रसारित केला जातो. शाळेच्या बस, व्यावसायिक, शिक्षक, नोकरवर्ग इत्यादी नागरिक आपले वाहने घेऊन ये जा करतात. तसेच शेतकरी सुद्धा या रस्त्यावर शेतात काम करण्यासाठी ये जा करतात.
महारुगडेवाडी येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे रस्त्यालगत विद्युत पोल झाडाच्या मधोमध अडकला होता व विद्युत पोल घरावर किंवा रस्त्यावर पडण्याची शक्यता होती. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्युत पोल पूर्ण जीर्ण झाला होता. हीच बाब नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ताबडतोब महाराष्ट्र राज्य विद्युतमंडळ विभागाशी संपर्क करून सांगितले.
कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या कानावर ती गोष्ट लगेच घातली त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ च्या हालचालींना वेग आला आणि तात्काळ विद्युत प्रवाह असणाऱ्या जीर्णपोलच्या बाजूला नवीन पोल बसवण्यात आला. याच कामामुळे कराड दक्षिण मधील आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांचे महारुगडेवाडी गावातील ग्रामस्थांनी विशेष आभार मानून कौतुक केले आहे.