आत्महत्या -खुन

ऑल इंडिया पँथर सेनेच्या दणक्यामुळे… पनवेल येथील सारा इंस्टिट्यूटच्या प्राचार्यवर गुन्हा दाखल!

झुंजार टाईम्स 

भालचंद्र गायकवाड:- कर्जत प्रतिनिधी 

दिनांक:- १२-०६-२०२५

पनवेल येथील पोयंजे ह्या ठिकाणी असलेल्या सारा इंस्टिट्यूट नर्सिग होममधे शिक्षण घेत असलेला औरंगाबाद येथील १९ वर्षीय तरुण उदय आगळे याने दिनांक ३ जून २०२५ रोजी रात्री १:०० वाजता च्या दरम्यान तेथील हाॅस्टेलच्या रुममधे गळफास घेऊन आत्महत्या केली होती..सदर प्रकरणी पनवेल तालुका पोलीस स्टेशनने त्यांचे जबाबा नोंदवून घेतले आणी शव विच्छेदन करून उदय आगळेची बाॅडी त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आली होती…..परंतु तेथील वास्तव परिस्थिती आणी उदय आगळेवर होत असलेल्या मानसिक अत्याचार, शारीरिक अत्याचार, जातीयवादी अत्याचार ह्या सर्व बाबींना गृहीत धरुन ज्या व्यक्तीने हा सर्व प्रकार उदय आगळे बरोबर केला. आणी शेवटी त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले. त्या प्राचार्य निशा नायरवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा हा पनवेल तालुका पोलीस स्टेशनमधे नोंदविण्यात आला नव्हता! गुन्हा नोंदविण्यासाठी उदय आगळेचा मोबाईल देखील पोलीसांच्याच ताब्यात होता…तरी देखील त्यातील फुटेज, काॅल रेकॉर्डिंग, CDR इतर पुरावे असतांना देखील गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता….म्हणून दिनांक १० जून २०२५ रोजी उदय आगळेचे आई वडील, नातेवाईक औरंगाबाद येथून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आले तेव्हा ऑल इंडिया पँथर सेना, रायगड जिल्ह्यातील तसेच पनवेल तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पनवेल तालुका पोलीस स्टेशनमधे उपस्थित झाले.

पुर्ण दिवसभरात तेथील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच तपास अधीकारी यांच्याबरोबर चर्चा करून मोबाईल मधील सर्व पुरावे तपण्यास भाग पाडले, उदय आगळेच्या आई वडीलांचे जबाब नोंदवून घेतले, निशा नायर बाबतीत सर्व हकिकत आई वडिलांकडून पोलीस अधीकारी यांच्या समोर मांडण्यात आली आणी ह्या सर्व बाबी तपासून पोलीसांकडून निशा नायरवर ॲट्रासीटी ॲक्ट सारखा गुन्हा तसेच इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. हा सर्व प्रकार ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांच्यामुळेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर आल्यामुळे पिडीत कुटुंबाला सारा इंस्टिट्यूट नर्सिग होम, पोयंजे पनवेल या संस्थेवर आणी प्राचार्य निशा नायरवर गुन्हा नोंद करता आला…

सदर गुन्हा नोंद करणेसाठी पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडगे, पोलीस निरीक्षक कांबळे, तपास अधीकारी  शेळके तसेच सर्व पोलीसांनी सुध्दा योग्य ते सहकार्य केले.

सदर गुन्हा दाखल करणोसाठी ऑल इंडिपा पॅथर सेना रायगड जि.अध्यक्ष नरेश गायकवाड, जि.संपर्क प्रमुख मंगेश सावंत, जि.कार्याध्यक्ष दयानंद सरवदे,पनवेल ता. अध्यक्ष सचिन कांबळे, पनवेल विधानसभा अध्यक्ष आकाश पाटेकर, ता.संघटक हनुमंत गांदले कर्जत ता.कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे कर्जत ता.अध्यक्ष भालचंद्र बळीराम गायकवाड, जय लहुजी संघटनेचे पदाधिकारी राजेश मोरे, वंचित बहुजन आघाडीचे पनवेल ता.अध्यक्ष आनंद गायकवाड, ता. महासचिव अविनाश अडांगळे ता.सचिव संतोष मुजमुले, चंद्रकांत नवगिरे, ता.संघटक संतोष ढोबळे, कामोठे विभाग अध्यक्ष महेंद्र असुर्डेकर जेष्ठ कार्यकर्ते मनोहर कांबळे, शे.का.पक्षाचे संतोष किर्तीकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button