आपत्कालीन व्यवस्थापन
हार्बर लोकल सेवा विस्कळीत..!

झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- पनवेल-उलवे प्रतिनिधी
मंगळवार दिनांक-१०.जुन, २०२५
सकाळी ८.वाजल्या पासुन सी-वुडस व नेरुळ दरम्यान हार्बर लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे.
कामानिमित्त बाहेर पडणा-या चाकरमान्याचं मात्र यामुळे मात्र प्रचंड हाल झाले,रेल्वेच्या लांबचलांब रांगामुळे प्रवासी रुळावरून चालताना दिसत होते.
तांत्रिक बिघाड कशामुळे नेमका झाला हे मात्र रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले नाही.
कालचा मुंब्रा रेल्वे अपघात आणि आजचा तांत्रिक बिघाड यांमुळे रेल्वे प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.
बातमी देई पर्यंत हार्बर रेल्वे सेवा सुरळीत झाली नव्हती.