माहिती तंत्रज्ञान
नवीमुंबई ते मुंबई करांचा प्रवास आता सुसाट.!

दैनिक झुंजार टाईम्स
महेंद्र माघाडे:- पनवेल उलवे प्रतिनिधी.
शनिवार दिनांक ७ जुन २०२५
नवीमुंबई ते मुंबई चा प्रवास आता आणखी एक नवीन तीन मार्गिकेच्या पुलामुळे जलद होउन, वाशी-मुंबई प्रवासाची वाहतुक कोंडी सुटणार आहे.
वाशी टोल प्लाझा जवळ होणा-या वाहतुक कोंडीमुळे १९९४.पासुन वाशीच्या खाडी पुलाच्या विस्तारीकरण चा प्रस्ताव होता.त्यानुसार ६ मार्गिकेच्या खाडीपुलाचे
MSRDA.ने काम चालु केले होते. ५.५०. कोटीच्या आसपास खर्च आला आहे. मानखुर्द ते वाशी एका बाजुच्या तीन मार्गीकेचा उद्घाटन ऑक्टोंबर महिन्यात होउन प्रवास खुला झाला होता. आणि आता प्रतिक्षेत असलेला वाशी ते मानखुर्द तीन मार्गी खाडी पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडुन ऑनलाईन ऊद्घाटन होऊन हा पुल आता प्रवासाठी खुला झाला आहे.