पर्यटन
लोणावळ्यातील पर्यटन स्थळावर पर्यटकांसाठी बंदी.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- १३-०६-२०२५
मावळ विभागात मान्सूनचा पाऊस चालू झाल्याचे चित्र दिसत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा लोणावळ्यात पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यातील पर्यटन केंद्रावर येत आहेत पण शासनाच्या आदेशानुसार भुशी तलाव, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना तलाव, इत्यादी ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
लोणावळा परिसरात रस्ते अपघात तसेच पर्यटक बुडीच्या अनेक घटना घडत आहेत त्यामुळे पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था यावर प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ३१ ऑगस्ट २५ पर्यंत परिसरात बंदी घालण्याचा आदेश लागू केला आहेत.