कोळेवाडी कराचा जगात डंका ‘कॉमरेडस अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ ‘मध्ये भरारी!

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- २०-०६-२०२५
कॉमरेड अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ जागतिक दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत भरवण्यात आली होती. माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक कणखरतेची आत्मपरीक्षा पाहणारी स्पर्धा म्हणून कॉमरेड मॅरेथॉन प्रसिद्ध आहे. ही स्पर्धा पूर्ण करणे हे प्रत्येक धावकाचे स्वप्न असते. भारतातील नावाजलेले मत्स्य उद्योजक कृष्णा गोसावी या कोळीवाडीच्या सुपुत्राने ही स्पर्धा पूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले. खरंतर कृष्णा गोसावी तालुका कराड येथील कोळेवाडीच्या डोंगर भागात जन्मलेले, करी कपाऱ्यातून धावण्याचा सराव असलेले व डोंगरकपाऱ्यातून वाट काढत धावण्याचे बाळकडू लहानपणापासून असल्यामुळे धावण्यामध्ये अगोदरच तरबेज होते. ते सध्या व्ययसायानिमित्त नवी मुंबई येथे वास्तव्यास असल्याने त्यांनी मॅरेथॉन साठी नवी मुंबई येथे त्यांचे कोच अमितकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण चालू केले. त्यासाठी लागणाऱ्या सर्व अटींची पूर्तता केली स्वतःला सिद्ध केले आणि म्हणूनच त्यांना दक्षिण आफ्रिकेत धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली.
८ जून रोजी पहाटे ५.३० वाजता सुरू झालेली ही थरारक स्पर्धा पीटरमारीटझबर्ग येथे सुरू होऊन डर्बन येथे संपली.९० किमी डोंगररांगा, नदी ,नाले या सगळ्यावर मात करून अखेर कॉमरेड अल्ट्रा मॅरेथॉन २०२५ जागतिक स्पर्धा पूर्ण केली. अवघ्या १० तास ३२ मिनिटे असा थरारक प्रवास करत ९० किलोमीटर अंतर धावत पार करून जागतिक स्पर्धेत कृष्णा गोसावी यांनी आपला ठसा उमटवला.
यावर्षीच्या स्पर्धेत ८० पेक्षा जास्त देशांनी सहभाग घेऊन २४००० स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेमध्ये ४१५ भारतीय स्पर्धक असून त्यामध्ये १६० महाराष्ट्रीयन धावपटूंनी अग्रेसर भूमिका बजावली होती.
कोळेवाडीचे कृष्णा गोसावी (मत्स्यव्यवसाय उद्योजक) नवी मुंबई येथे कार्यरत असून त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉन मध्ये कराड तालुक्याचा नावलौकिक वाढवला. त्याच बरोबर कराडचे महाजन हॉस्पिटल चे डॉक्टर महाजन व संदीप पाटील यांनीही या स्पर्धेत भाग घेऊन कराडचे नावलौकिक वाढवला आहे. तसेच कृष्णा यांना अमित कुमार यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर त्यांच्यासह त्यांच्या हॅप्पी फिट चॅम्पियन्स या समूहातील खेळाडूंनी यशस्वीरीत्या ही स्पर्धा पूर्ण केली. त्यांच्या समूहाकडून गोसावी यांचे कौतुक केले जात आहे. त्यांच्या या स्पर्धेतील यशाचे कराड तालुक्यातील अनेक मान्यवर, हितचिंतक व कोळेवाडीतील ग्रामस्थ यांनी तोंड भरून कौतुक केले आहे.