जगदगुरु तुकाराम महाराज यांची पालखी देहू गावातून प्रस्थान.

झुंजार टाईम्स
अमोल पाटील:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक १८-०६-२०२५
दरवर्षीप्रमाणे आज जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पालखी देहू गावातून पंढरपुराकडे प्रस्थान झाली. महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र व भक्ति पूर्ण धार्मिक उत्सव आहे. १७ व्या शतकात पालखीची परंपरा त्यांच्या वंशजाने परंपरा सुरू केली. या पालखीत लाखो भाविक संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत सहभाग घेतात.
देहू ते पंढरपूर असा २१० किलोमीटरचा पालखी सोहळा किमान २१ ते २२ दिवस चालतो. गावा गावातून दिंड्या यामध्ये सहभागी होतात. देहू, आळंदी, पुणे, सासवड, बारामती, वडी, निरा, मलवडी, अकलूज, वाखरी आणि शेवटी पंढरपूर असा पालखीचा प्रवास असतो. या वारीत निस्वार्थ, सेवा, भक्ती भाव, आणि शिस्त पद्धतीचे दर्शन होते.
जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पादुका ठेवून टाळ, मृदंग, अभंग, किर्तन करत पुण्याकडे प्रस्थान होते. या मुख्य कार्यक्रमात पूजा, अभिषेक, करूनच पालखी प्रस्थान केली जाते. या भक्तमय वातावरणात लाखो भाविक सामील होतात.
या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पांढरे धोतर, भगवा झेंडा, फेटा, परिधान केलेले असते. या पालखीत टाळ्या मृदंगाच्या गजरात पंढरीनाथाची वाट पाहू, विठोबा माऊली तुकाराम जयघोष करीत भाविक दिंडी सोहळ्यात सहभागी होतात.
यावर्षी तुकाराम महाराज पालखी १८ जून रोजी सकाळी प्रस्थान पूजा पाठ करून प्रस्थान करण्यात आली या पालखी सोहळ्यात ४०० पोलिस,५०० दिंडी आणि सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले होते. या पालखीमध्ये जनरेटर, रुग्णवाहिका, आरोग्य सेविका, पोलीस कंट्रोल रूम व्यवस्था केलेली होती.