माहिती तंत्रज्ञान
आधार कार्ड अपडेट न केल्यास सुविधांपासून वंचित राहाल.

झुंजार टाईम्स
उमाजी मंडले:- पनवेल प्रतिनिधी
दिनांक:- ०८-०६-२०२५
सरकारी काम करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड आहे. पण सध्या काही बोगस कार्ड सापडले आहेत; त्यामुळे केंद्र सरकारने सर्व नागरिकांना आधार कार्ड अद्ययावत करण्यास सांगितले आहे.
जर तुम्ही तुमचे आधार कार्ड अद्ययावत केले नसेल, तर तातडीने ते करा! अन्यथा, तुम्हाला चार महत्त्वाच्या सुविधांपासून मुकावे लागेल. प्रथम, बँकेच्या सेवा पूर्णपणे थांबतील, ज्यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात. दुसरे, UPI सारख्या डिजिटल व्यवहारांना खीळ बसेल. तिसरे, पेन्शन आणि रेशन यांसारख्या सरकारी योजनांचा लाभमिळणार नाही. शिवाय, तुमचे क्रेडिट आणि डेबिट कार्डही बंद होण्याचा धोका आहे.