आर्थिक घडामोडी
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.
लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन!

झुंजार टाईम्स
पनवेल प्रतिनिधी:- कांतीलाल पाटील
वसमत : ३०-०४-२०२५
मंडळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसमत येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी सांगितले की, कोणी कितीही संभ्रम निर्माण केला तरी, माझ्या लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. मी तुमच्यासाठी ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा.
वसमत येथील प्रसाद मंगल कार्यालयात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात माजी मंत्री नवाब मलिक, आमदार राजू नवघरे, आमदार विक्रम काळे, रामदास पाटील सुमठाणकर, तानाजी बेडे, बालूमामा ढोरे, मुजीब पठाण, कांचनताई शिंदे आणि अन्य नेते उपस्थित होते.