वाढदिवसाच्या शुभेच्छा
ठकसेन माघाडे,यांच्या लग्नाचा वाढदिवस दिमाखात साजरा..

झुंजार टाईम्स.
महेंद्र माघाडे:- उलवे प्रतिनिधी.
दिनांक:- १३-०५-२०२५
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे,स्पोर्ट्स अरेना टीशर्ट मेकर व आतिष क्रिएशन चे प्रोप्रायटर व युवा उद्योजक अक्षय व आतिष ठकसेन माघाडे यांचे आई – वडील ठकसेन माघाडे व मंगल ठकसेन माघाडे यांच्या लग्नाचा वाढदिवस दिनांक-१२ मे रोजी,उलवे येथील घरात साजरा करण्यात आला.
ठकसेन माघाडे यांची सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांचा सर्वांना मदत करणे हा गुणधर्म त्यांची मुलंही जोपासत असुन शून्यातून विश्व निर्माण करत आपला व्यावसाय वाढवत लोकांशी सलोखा केला आहे.
लग्नाच्या वाढदिवसाला नातेवाईकासह, व्यावसायिक, नगरसेवक, राजकारणी, पोलिस आधिकारी ई. लोकांनी हजेरी लावुन उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.